महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते शनिवारी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

लिंगायत गवळी विकास फाउंडेशनचा शनिवारी, राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सोहळा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ०७ ऑगस्ट २०२६) लिंगायत गवळी विकास फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने शनिवारी, पिंपरी येथे माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. संभाजी बारसे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

शनिवारी, (दि. ८ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता, संत तुकाराम नगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कार्यक्रम सुरू होईल. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच राज्यातील प्रतिष्ठित बंधू-भगिनींचा “समाज गौरव पुरस्कार – २०२६” देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी, कार्यकारी अध्यक्ष वसंत नामागवळी तसेच धाराशिव येथील प्रा.भालचंद्र हुच्चे, खंडू बहिरवाडे, नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक उमाकांत जोमीवाले, पिंपरी चिंचवड नगरसेविका अरुणाताई लंगोटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रदेश युवक अध्यक्ष प्रवीण हुंडीवाले, चाळीसगाव येथील सुपाआप्पा पिरनाईक, अक्कलकोट येथील डॉ. किसन झिपरे, सोलापूर येथील सुरेश शहापूरकर, धुळे येथील बंटीभाऊ घुगरे, जळगाव येथील कृष्णभाऊ गठरी, नाशिकचे सोमनाथ हिरणवळे, पुण्यातील उद्योजक भगवान औशीकर, प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर अनिल नायकू आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यकारणी सदस्य प्रकाश चौधरी, वामन काटकर, मधुकर बिडकर, राजेश चौधरी यांनी दिली आहे. या कार्यक्रमास पुणे, पिंपरी चिंचवड मधील सर्व समाज बंधू, भगिनींनी उपस्थित रहावे असेही आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button