महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेसामाजिक
साई मंदिरात घेतले हजारो भाविकांनी दर्शन
विजयादशमी आणि साईबाबा पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम
पिंपरी, पुणे ( दि. १३ ऑक्टोंबर २०२४) विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त वडमुख वाडी येथील साई मंदिरामध्ये हजारो भक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शनिवारी, विजयादशमीच्या दिवशी दुपारची आरती विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिरातील दीपोत्सवात भाविकांनी सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता रविवारी श्रीं ची काकड आरती, सनई वादन, मंगलस्नान, गोपाळकाला, माध्यान्ह आरती, धुपारती, शेजारती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली.