विजयादशमी निमित्त साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, पुणे ( दि. १० ऑक्टोंबर २०२४) शनिवारी साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे – आळंदी रोड, वडमुख वाडी येथील साई मंदिरामध्ये रविवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिर, वडमुखवाडी, आळंदी रोड पुणेचे विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
विजयादशमीच्या निमित्त पुर्वसंध्येला शुक्रवारी (दि.११) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, पारायण प्रारंभ, सकाळची आरती यानंतर दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी धुपारती, रात्री शेजारती होणार आहे.
तसेच मुख्य दिवशी शनिवारी (दि.१२) विजयादशमीच्या निमित्त पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, पारायण सांगता सोहळा, रुद्राभिषेक, भिक्षा झोळी, भजन कार्यक्रम यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती होणार आहे. आरती नंतर दीपज्योत व श्रीं चे नामस्मरण, श्रीं ची प्रार्थना, नंतर ४:३० वाजता सिमोल्लंघन व मिरवणूक, श्रीं ची पालखी, धुपारती, भजन कार्यक्रम, धुपारती व श्री हरिजागर रात्री ११ वाजता असे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी मुख्य दिवशी देवस्थान रात्रभर दर्शनाकरिता खुले राहील.
रविवारी (दि.१३) पहाटे ५:१५ वा. श्रींची काकड आरती, सनई वादन, मंगलस्नान, ७ वा. श्रींची आरती, सकाळी ११ वा. गोपाळकाला, दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, संध्याकाळी ७ वा. धुपारती, रात्री १० वा. श्रींची शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल. या धार्मिक सोहळ्यामध्ये सर्व भक्त व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त सुभाष नेलगे यांनी केले आहे.