आरपीआयचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी मे महिन्यात महाराष्ट्र दौरा करणार – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
नवनियुक्त शहराध्यक्ष विलास कांबळे यांना काम सुरू करण्याचे रामदास आठवले यांचे आदेश

पिंपरी, पुणे (दि. २७ मार्च २०२६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्वसामान्य जनतेला संविधानाद्वारे हक्क दिले आहेत. याची माहिती घरोघरी पोहोचली पाहिजे. यासाठी मी स्वतः आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी एक मे पासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. यामध्ये विभागीय व जिल्हास्तरावर मेळावे आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिव, फुले, शाहू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आदेश आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबई येथे दिले.

पिंपरी चिंचवड आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानिमित्त विलास कांबळे यांनी प्रदेश पदाधिकारी व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसमवेत नामदार रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले यांनी १ मे २०२६ पासून स्वतः कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगितले व तसे कार्यकर्त्यांना आदेश दिले.

यावेळी आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर, सरचिटणीस, अ.आ.म.प. खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर, जेष्ठ आरपीआय नेत्या लताताई ओव्हाळ, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, महिला शहराध्यक्ष कमलताई कांबळे तसेच सरचिटणीस दयानंद वाघमारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब रोकडे आणि लिंबराज कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप नाना साळवे, उपाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, रमेश गजरमल, विशाल कदम, रघु गव्हाळे, प्रकाश बुक्तर, अशोक कांबळे, सुरेश आठवले, नंदू मस्के; पक्षप्रवक्ता भारत बनसोडे, संपर्क प्रमुख विकास कडलक, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत चव्हाण, सदस्य सुंदर कांबळे, संघटक पांडुरंग कांबळे, दुर्गाप्पा देवकर, सह संघटक सुभाष मस्के, शरणू नाटेकर, सहसचिव तुकाराम गायकवाड, सचिव बालाजी जाधव, सल्लागार गोरख गायकवाड, विठ्ठल माने आदींसह नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकारी सदस्य आदी मुंबई दौऱ्यात सहभागी झाले होते.
——————————————————————



