महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

वार्षिक स्नेह संमेलनातून घडतात मोठे कलाकार – महापौर रवी लांडगे

स्व. श्री फकीरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजोथेरपीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २७ मार्च २०२६) स्व. आण्णासाहेब मगर यांनी स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख झाली आहे. या नगरीच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी शहरात सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. स्व. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मधील स्नेह संमेलनातून उद्याचे मोठे कलाकार घडतील असा विश्वास पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला.

स्व. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, निगडी येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “अंतर्नाद – २०२६” ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे दिशा काटकर, परीक्षक जॉर्डन संसारे, स्व. फकीरभाई पानसरे फाउंडेशनचे अध्यक्ष निहाल पानसरे, संचालिका डॉ. झोया पानसरे, संचालक डॉ. श्याम अहिरराव, प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी,समन्वयक राजू शिंगोटे, डॉ. श्वेता पाचपुते, डॉ. गार्गी भालेकर, डॉ. भाग्यश्री गोलवलकर, डॉ. मानसी चौधरी, डॉ. नमिता परब, डॉ. अर्पिता भोंडवे, डॉ. मंजुषा नागे, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी सचिव अनुज रेटवडे, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

महापौर रवी लांडगे संवाद साधताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जशी शैक्षणिक क्षेत्राची गरज आहे, तसेच त्यांच्या स्वप्नांना व कलागुणांना वाव देण्यासाठी अशा वार्षिक स्नेह संमेलनाची देखील गरज आहे. यासाठी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते निहाल पानसरे आणि डॉ. झोया पानसरे, संचालक डॉ. श्याम अहिरराव आणि संस्थेचे सर्व विश्वस्त योगदान देत आहेत हे अभिमानास्पद आहे.

संचालक डॉ. शाम अहिरराव यांनी ही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा वार्षिक आढावा घेतला.

संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, एकांकिका असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये सोलो नृत्यासाठी ईश्वरी शिरसाट, डुएट नृत्यासाठी तन्वी व डेबलिना तसेच शिंपली वालदे व हर्षला सावंत, ग्रुप डान्स साठी तृतीय वर्षातील तन्वी एकदारी व ग्रुप यांनी पारितोषिक पटकावले.

क्रिकेट स्पर्धेत चतुर्थ वर्ष (अनिरुद्ध शेजुले व टीम), हॉलीबॉल मधून तृतीय वर्ष (विधी जायगुडे व टीम), थ्रो बॉल मधून चतुर्थ वर्ष (अमृता मंडल व टीम), डॉजबॉल मधून चतुर्थ वर्ष (आर्या भोसले व टीम) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट बॅच द्वितीय वर्षातील विद्यार्थी, सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक बॅच द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी व सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स बॅच म्हणून चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी रिया फुलसुंदर, सानिका जाधव, कार्तिक पाटील, मयूर कापरे, प्रियंका मुसळे व समृद्धी कस्पटे यांनी नियोजनात सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत राजू शिंगोटे यांनी केले.

प्रास्ताविक डॉ. श्वेता पाचपुते, डॉ. गार्गी भालेकर, सूत्रसंचालन रिया फुलसुंदर व सानिका जाधव आणि तनया निम्हण यांनी आभार मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button