महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज स्पर्धेत पीसीसीओइला प्रथम क्रमांकासह पाच लाखांचे बक्षीस

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २७ मार्च २०२६) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या वतीने आयआयटी, हैदराबाद येथे आयोजित केलेल्या “नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज हॅकॅथॉन २०२६ अ‍ॅक्सिलरेटिंग हेल्थ क्लेम्स जर्नी” या स्पर्धेत पीसीसीओइच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. या टीम मध्ये तृतीय वर्ष विद्यार्थी अभिषेक निकम, तृप्ती सुकाळे, कोसदा भट आणि द्वितीय वर्ष विद्यार्थी हर्षिल बियाणी व अंश दुधे यांचा समावेश होता.

पीसीसीओई चे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, सह प्राध्यापक डॉ. सांत्वना गुडधे यांनी मार्गदर्शन केले.

ही स्पर्धा हैदराबाद येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण द्वारा आयआयटी हैदराबाद, एनआरसीइएस, जनरल इन्शुरन्स कौन्सिल, गुगल, इंडिया इन्सुरटेक असोसिएशन आणि एनएचसीएक्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा देशभरातील नवोन्मेषक, स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भारताच्या आरोग्यसेवा डिजिटल मध्ये परिवर्तित करून त्यांना बळकटी देणे हा उद्देश होता.

यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओइ) कॉम्प्युटर एआय एमएल विभागातील विद्यार्थ्यांनी देशभरातील प्रतिभावान स्टार्टअप्सशी स्पर्धा करून “प्रोब्लेम सॉलविंग ३” या विभागात ५,००,००० रोख बक्षीसा सह प्रथम क्रमांक पटकावला. या टीमने ‘क्लेमसिंक एआय’ नावाचा एक नाविन्यपूर्ण उपाय विकसित केला. यामध्ये जटिल आणि असंरचित आरोग्य विमा कागदपत्रांना संरचित, इंटर ऑपरेबल डिजिटल डेटामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईला प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळणे हा एक समृद्ध अनुभव आहे असे पीसीसीओई चे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

यशस्वी टीम आणि मार्गदर्शकांचे पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button