महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

राज्यस्तरीय “डिपेक्स २०२६” स्पर्धेत पीसीपीचा द्वितीय क्रमांक

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २६ मार्च २०२६) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (एमआयटी) छत्रपती संभाजी नगर मधील कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय “डिपेक्स २०२६” प्रदर्शन स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन (पीसीपी) मधील विद्यार्थ्यांनी “लेन गार्ड ए आय बेस्ड ऑटोमेटेड बीआरटी लेन व्हायोलेशन सिस्टीम” या विषयावर अभिनव आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प सादर करून यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तंत्रशिक्षण विभागाचे संचालक (डीटीइ) डॉ. विनोद मोहीतकर यांच्या हस्ते त्यांना रोख बक्षीस व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत राज्यभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील १२०० विद्यार्थी व एकूण ३२३ संघ सहभागी झाले होते. कम्प्युटेशनल इंटेलिजन्स विभागातून उत्कृष्ट ३० ग्रुप निवडण्यात आले होते, त्यामध्ये पीसीपी च्या संघाचा समावेश होता.

पीसीपीच्या संघात स्वयंम ढवळे, अभिषेक देशमुख, तनया पाटील, श्रावणी गायकवाड, आयुषी ढेपे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. पीसीपी च्या विद्यार्थ्यांनी “लेन गार्ड ए आय बेस्ड ऑटोमेटेड बीआरटी लेन व्हायोलेशन सिस्टीम” या विषयावर अभिनव आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा प्रकल्प सादर केला. त्यात पुणे, मुंबई सारख्या शहरात बीआरटी मार्ग बसेस साठी निर्माण करण्यात आला आहे. परंतु साधारण वाहने देखील यातून प्रवास करतात व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीत अडथळा निर्माण करतात. याला आळा घालण्यासाठी या विद्यार्थ्यांनी एआय प्रणाली वापरून हा प्रकल्प सादर केला. विद्यार्थ्यांना पीसीपीच्या प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड, प्रा. मंगला मालकर, प्रा. मृणाल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीपीच्या प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
———————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button