विकास आणि हिंदुत्व ही दोन्ही चाके एकत्र – रवींद्र चव्हाण
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने प्रचाराचा शुभारंभ

पिंपरी, पुणे (दि. ०३ जानेवारी २०२६) “वसुधैव कुटुम्बकम” ही विचारधारा सर्व जग मान्य करत आहे. अवघी वसुंधरा कुटुंबाप्रमाणे मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. जगाचे लक्ष आता भारताकडे आणि वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थ व्यवस्थेकडे आहे. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक कारभार मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सबका साथ, सबका विकास हे भाजपाचे ध्येय आहे. विकास आणि हिंदुत्व ही दोन्ही चाके सोबत घेऊन ध्येयपूर्ती करायची आहे असे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि.३) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्प येथे अभिवादन करून करण्यात आला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, महिला मोर्चा प्रमुख सुजाता पालांडे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, भाजपा दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, शहर सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाड्ड्ये आणि भाजपाचे सर्व प्रभागातील उमेदवार, माजी नगरसेवक, भाजपा शहर पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, बहुसंख्य मतदार आदी उपस्थित होते.

यावेळी बिनविरोध निवड झालेले रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्यांचा सत्कार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच टप्प्यात स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश केला. त्यामुळे शहरातील पायाभूत सेवा, सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित झाला. सर्व नागरिकांना विकासाच्या प्रवाहात सामील करून घ्यायचे आहे. याचे नियोजन केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आम्हाला हिंदुत्वाचे नाव घ्यायला भीती वाटत नाही, कारण आमच्या अंगात ताकद आहे. ती भाजप शिवाय इतर पक्षात नाही.

विकास आणि हिंदुत्व ही दोन्ही चाके सोबत घेऊन ध्येयपूर्ती करायची आहे. फक्त मतांच्या राजकारणासाठी भाजप नाही. निवडणुक दहा दिवसांवर आली आहे. हे दहा दिवस महत्वाचे आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांनी संपूर्ण पॅनेल विजयी करण्यासाठी मतदारांच्या दारात गेले पाहिजे. शंभर उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय गाठण्यासाठी पॅनेलमधील चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत.

केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. आता पुन्हा पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता आली की, येथील विकास कामांना मुबलक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या निवडणुकीत चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता जाता कामा नये. आमच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी पैलवान लांडगे सक्षम आहेत. आमदार महेश लांडगे यांनी अजून पैलवानकी सोडलेली नाही असे खडे बोल रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेला विकासाचा अजेंडा घरोघर जाऊन मतदारांना समजून सांगा आणि आज भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करा असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.

यावेळी पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष आयुष निंबाळकर, माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, सुषमा तनपुरे, शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर आणि संदिप वाल्हेकर, भोसरी विधानसभेतील भरत लांडगे, शिवसेना (उबाठा) पिंपरी चिंचवड शहर संघटक संतोष वाळके, अविनाश लोणारे, भाऊसाहेब काटे साईनाथ ढाकणे, मनोज परांडे, राजकुमार बांगर, सचिन नायकुडे, सुभाष खेडकर, नवनाथ परांडे, पंडित वाळके, बापु परांडे, नितीन परांडे, पप्पु तुपे, चेतन कदम, संकेत परांडे, शुभम वाळके, ऋत्विक कदम, अमित सोरटे, सुदर्शन कदम, अजय काळे, प्रदीप परांडे, किरण वाळके, अजय परांडे, निलेश वाळके आणि राष्ट्रवादीचे अन्वर शेख, गणेश सानप, संतोष फुंदे, रविंद्र राख, अजहर खान, गंगाताई धेंडे, ॲड. विशाल जाधव, गणेश सस्ते, गणेश यादव, शुभांगी जाधव आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
—————————————————————-



