महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

सविता आसवानी यांनी साधला महिलांशी संवाद

Spread the love

पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अनेक प्रभागातील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १९ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सविता धनराज आसवानी यांनी गुरुवारी बौद्ध नगर परिसरात महिलांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मागील ८ ते ९ वर्षांपासून बौद्ध नगर परिसरात पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, या परिसरातील दुर्गंधी बाबत महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त असल्याचे दिसून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या शहरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध काम करू असे यावेळी सविता धनराज आसवानी यांनी महिला भगिनींना सांगून आश्वस्त केले.

यावेळी नंदा कुंजीर, बबली शेख, कोमल तडसरे, अनिता तलवारे, सविता ढावरे, शोभा दोडके, स्वाती सूर्यवंशी, ज्योती कांबळे, पूनम रोकडे, मनीषा सांगुळे, निशा नुरुडे, श्रद्धा रोकडे, मंगल पवार आदी महिलांनी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाचा चिन्हापुढील बटण दाबून सविता आसवानी व सहकारी उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले.


——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button