निगडी येथे रंगली “ना सांगताच आज हे कळे मला…” मराठी–हिंदी चित्रपट गीत मैफील

पिंपरी, पुणे (दि. २७ नोव्हेंबर २०२५) – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत “ना सांगताच आज हे कळे मला…” या मराठी–हिंदी चित्रपटगीतांच्या संगीत मैफलीने गदिमा नाट्यगृहात रसिकांना मंत्रमुग्ध केले. निगडी प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात झालेल्या या खास सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

यावेळी दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, साहित्यिक राज अहिरराव, मल्लिकार्जुन इंगळे, विलास गादडे, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, सार्थक भिंगारे, साक्षी भिंगारे, साहिल कांबळे, अनिल घाडगे, राजू भिंगारे, सुनीता भिंगारे आदी उपस्थित होते.
नंदकुमार कांबळे, विनायक कदम, सुचिता शेटे, डॉ. आरोही पाटे, डॉ. संदीप गायकवाड, अतिथी गायिका ललिता जगदाळे, सतीश कापडी, अरुण सरमाने, नेहा दंडवते आणि विलास खरे या गायकांनी कृष्णधवल काळातील गीतांपासून २००० च्या दशकातील गाण्यांचे सादरीकरण केले.
प्रत्येक गीतासोबत त्याच्या निर्मितीचा इतिहास आणि संदर्भित चित्रपटातील दृश्ये प्रदर्शित केल्यामुळे रसिकांच्या मनावर छाप सोडून गेले.
‘सून साईबा सून…’, ‘फकिरा चल चला चल’, ‘तूने ओ रंगीले कैसे जादू किया’, ‘झुमका गिरा रे’, ‘यह काली काली आंखें’ अशा लोकप्रिय एकल गीते तसेच ‘आके तेरी बांहो में’, ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’, ‘दिल हूं हूं करे’, ‘तुमको पिया दिल दिया’, ‘अच्छा जी मैं हारी’ अशी युगुल–द्वंद्व गीते सादर केली गेली.
बालकलाकार सिया आणि तिचे वडील डॉ. संदीप गायकवाड यांनी सादर केलेले “अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ न” हे गीत विशेष दाद मिळवून गेले.
कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचे “ना सांगताच आज हे कळे मला” या गीताचे सादरीकरण रसिकांना भावले.
कार्यक्रमाचा समारोप “ऐसा पहली बार हुआ है सत्रह–अठरा सालों में…” या गीताने करण्यात आला.
या मैफलीचे संयोजन विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. ध्वनिसंयोजन शैलेश घावटे, तांत्रिक सहाय्य व छायाचित्रण विक्रम क्रिएशन यांनी तर निवेदन सीमा गांधी यांनी केले.
—————————————————————



