महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीशैक्षणिकसामाजिक

आई, वडील हेच सर्वोच्च गुरू – नवनाथ बोऱ्हाडे

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कासारवाडी येथे संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १८ नोव्हेंबर २०२५) जीवनामध्ये गुरूंना महत्त्वाचे स्थान आहे, परंतु आई, वडील हेच पहिले व सर्वोच्च गुरू आहेत असे प्रतिपादन नवनाथ बोऱ्हाडे यांनी केले.

सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन एकमेकांना मदत करणे आणि सामाजिक सलोखा वाढविणे या उद्देशाने रविवारी, कासारवाडी माध्यमिक विद्यालयातील १९८६ – ८७ च्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नवनाथ बोऱ्हाडे यांनी संवाद साधला. यावेळी ३८ वर्षा पूर्वीचे सवंगडी एकत्र आले होते. सर्वांनी गत काळातील गोड स्मृतींना उजाळा देत मनमुराद आनंद घेतला. मागील वर्षात दिवंगत झालेले माजी विद्यार्थी मित्र दीपक राऊत, बाळासाहेब नेवाळे, राजेश कांबळे, राजेंद्र प्रसाद, हेमलता कोळी, सावता बुणगे, संतोष बनकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

१९८६ – ८७ या वर्षात प्रथम क्रमांक मिळविलेल्या सरोजिनी जाडर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी कराओके सिस्टीम वर हिंदी, मराठी गाणी सादर केली. सुधाकर पाढळकर, प्रकाश कानडे, गणेश पठारे, रेखा चव्हाण, शर्मिला साळवी आणि हेमंत लांडे यांनी श्रवणीय गाणी सादर केली, दिनेश जोशी यांनी शालेय जीवनातील गमतीदार किस्से सांगितले. संगीत आणि नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला.

चिमण लांडगे, प्रकाश कानडे, रवींद्र चेडे, अविनाश जासूद, सुनील शेटे, वैशाली गुळवणी, मालती धुमाळ, संगीता गोरडे, रोहिणी वाघमारे, संगीता चव्हाण,मंगल बाजारे ,अशोक कोंढावळे, उर्मिला व्यास या माजी विद्यार्थ्यांनी मनोगतांमधून शालेय आठवणींना उजाळा दिला.

घमाजी लांडगे, रवींद्र लांडगे, सोमनाथ शिंदे, अनिल बांगर, संदीपराजे शिर्के, दीपक परदेशी, राजेंद्र शिवशरण, दिनेश जोशी, सुनील बोरकर, प्रवीण लांडे यांनी संयोजनात सहभाग घेतला.

प्रास्ताविक शशिकांत शिंदे, सूत्रसंचालन शशिकांत शिंदे, ध्वनी व्यवस्था शैलेश घावटे, आभार अनिल बांगर यांनी मानले.
——————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button