एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुलींचा जिल्हा क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक

पिंपरी, पुणे (दि. १४ नोव्हेंबर २०२५) पुणे जिल्हा परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यांमध्ये रहाटणी येथील एसएनबीपी स्कूलच्या संघावर ७३ धावा व दहा गडी राखून विजय मिळवून विभागीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विजयी संघामध्ये अनघा आहेर, श्रेया तरस, आस्था टाक यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत उत्तम कामगिरी केली.
या जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत एकूण ४३ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस, स्पर्धा प्रमुख ऐश्वर्या साठे, सुनिता पालवे आदी उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापक शुभांगी कुलकर्णी, क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजयी संघाच्या मुलींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
——————————————————————————–



