महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीसामाजिक
सुरेश भोसले यांचे निधन

पिंपरी, पुणे (दि. ५ ऑगस्ट २०२५) हवाई दलाचे निवृत्त फ्लाईंग ऑफिसर आणि मोशी प्राधिकरण, केंद्रीय विहार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुरेश विनायकराव भोसले (वय ६१ वर्षे) यांचे सोमवारी (दि. ४) निधन झाले. भोसले हे १९८१ साली दिल्ली येथे हवाई दलात सेवेमध्ये रुजू झाले आणि २०२१ मध्ये पुण्यातून फ्लाईंग ऑफिसर या पदावरून निवृत्त झाले. सोमवारी, सायंकाळी केंद्रीय विहार मोशी येथे लोहगाव पुणे येथील हवाई दलाच्या तुकडीने त्यांना मानवंदना दिली. त्यांचे मूळगाव मु. पो. देवताळ मोतोला, तालुका औसा, जिल्हा लातूर येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, एक विवाहित मुलगी, एक मुलगा, सून, जावई, नातू असा परिवार आहे.



