पीसीसीओई मध्ये शुक्रवारी महिला सबलीकरण कार्यशाळा

पिंपरी, पुणे (दि. १५ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे शुक्रवारी (दि.१८) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. १८ जुलै) सकाळी १० वाजता, मानसोपचार मार्गदर्शक डॉ. मानसी सोनगीरकर बोराडे आणि आयुर्वेद तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुप्रिया गुगळे या मार्गदर्शन करणार आहेत.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उप संचालक डॉ. निळकंठ चोपडे, कार्यशाळा समन्वयक डॉ. वृषाली भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.



