स्पोर्ट्स फॉर ऑल स्पर्धेत दुर्वा वाजेने रौप्य पदक पटकावले
पिंपरी, पुणे (दि. २१ डिसेंबर २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी दुर्वा वाजे हिने नुकत्याच झालेल्या (SFA ) स्पोर्ट्स फॉर ऑल चॅम्पियनशिप, पुणे या स्पर्धेत तायक्वांदो अंडर-५२ या वजन गटात अप्रतिम कौशल्ये दाखवत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्य पदक प्राप्त केले. दुर्वाला चंद्रकांत ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दूर्वा वाजेचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.