महेशदादा लांडगे यांनी संपूर्ण मतदारसंघावरच फोकस करून कामे केली प्रा. सोनाली गव्हाणे यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. १४ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे यांनी ‘व्हिजन २०-२०’ मध्ये सांगितलेल्या कामांपेक्षा कैकपटीने अधिक कामे केली आहेत. विशिष्ट बाबींवर फोकस न करता संपूर्ण मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे दहा वर्षांपूर्वी आऊटस्टँडिंग असलेली व अन्य कोणीही न केलेली कामे किंबहुना खासदाराच्या लेव्हलची कामे सुद्धा आमदार महेशदादा लांडगे हेच करत आहेत. असा गौरवपूर्ण उल्लेख पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण मंडळाच्या माजी सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी केला. केलेल्या विकास कामांच्या बळावर यावेळी ही आमदार महेशदादा लांडगे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. गव्हाणे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये भोसरी उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी ही बाब तसेच एकूणच वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन उपाययोजना सुरू केल्या. पुणे नाशिक महामार्गाचे रुंदीकरण हाती घेतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून नाशिक फाटा ते चांदोली, तळेगाव चाकण शिक्रापूर पुणे शिरूर तिने महामार्गासाठी १९ हजार कोटी खर्चाला मंजुरी आणली. त्याची निविदा ही निघाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होईल लोकांचा वेळ वाचेल. इंधन बचत ही होईल असे प्रा.गव्हाणे म्हणाल्या.
आमदार महेशदादा लांडगे यांनी पाठपुरावा करून पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सेमी हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्टला मंजुरी आणली आहे. त्यामुळे उत्तर भारत व दक्षिण भारत जोडला जाणार आहे. ही कौतुकाची बाब असल्याचे प्रा.गव्हाणे यांनी सांगितले.
आमदार महेश दादा यांनी पिंपरी चिंचवड चा पाणी प्रश्न लक्षात घेऊन आंध्रा तसेच भामा आसखेड मधून पाणी प्रकल्प साकारला. पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू केले. पिंपरी चिंचवड ही क्रीडा नगरी व्हावी असा ध्यास घेऊन कुस्ती संकुल कबड्डी सेंटर सुरू केले. लवकरच माझ्याच प्रभागात महापालिकेची शाळा उभारण्यात येत असून तेथे गुरुकुलच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. पिंपरी चिंचवड हे एज्युकेशन हब व्हावे यासाठी महेशदादा यांनी प्रयत्न केले त्यांच्या पुढाकाराने भोसरी मतदारसंघात आयटी सेंटर सुरू होत आहे तेथे २५ हजाराहून अधिक तरुणांना रोजगार मिळेल. एकूणच आजवर आऊटस्टँडिंग असलेली म्हणजेच कोणीही न केलेली कामेही यांनी केली आहेत असे प्रा. गव्हाणे यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी इंद्रायणी थडी हा उपक्रम सुरू केला. मात्र केवळ पाच दिवसासाठी महिलांसाठी हा उपक्रम राबवून चालणार नाही हे लक्षात घेऊन आता महेश दादा लांडगे यांच्या वतीने इंद्रायणी थडी ॲप तयार केला जाणार आहे. त्याद्वारे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ब्रँड नेम मिळवून देणे व त्यांना त्यांच्या वस्तू विक्रीची संधी उपलब्ध करून देणे अशा पद्धतीचे मोठे काम उभे राहणार आहे असे प्रा. गव्हाणे यांनी सांगितले. केवळ एकाच गोष्टीवर फोकस न करता संपूर्ण मतदार संघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आमदार महेश दादा लांडगे यांनी कामे केली असल्याने यावेळी ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास प्रा. गव्हाणे यांनी व्यक्त केला.