महेश लांडगे यांनी व्हीजन डोळ्यासमोर ठेवून व कोणताही दुजाभाव न ठेवता कामे केली – शांताराम भालेकर यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. १३ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे यांनी कामे करताना व्हीजन डोळ्यासमोर ठेवून व कोणताही दुजाभाव न ठेवता कामे केली असे प्रतिपादन माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी माध्यमांशी बोलताना केले.
भालेकर म्हणाले की, भोसरी मतदारसंघ विकासापासून वंचित होता. गेल्या दहा वर्षाचा आमदार महेशदादा लांडगे यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अतिशय निस्वार्थीपणे व कोणताही दुजाभाव न ठेवता व्हीजन डोळ्यासमोर ठेवून विकास कामे केल्याचे दिसते. आमदार महेशदादा यांनी तळवडे येथे जैवविविधता प्रकल्प (बायोडायव्हर्सिटी) प्रकल्प आणला. अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे लोकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली. संविधान भवनची संकल्पना आमदार लांडगे यांनी मांडली. त्यासाठी जागा मिळवली. त्यामुळे ऐतिहासिक असा संविधान भवन प्रकल्प भोसरी मतदारसंघात साकार होत आहे. त्यांच्याच पुढाकाराने च-होली येथे आयटी पार्क होत आहे. मोशी येथे साडेआठशे बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येत आहे त्यामुळे शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण बराचसा कमी होईल तसेच नव्याने समाविष्ट गावातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल असे भालेकर म्हणाले.
हिंदुत्ववादी नेता म्हणूनही आमदार महेशदादा लांडगे यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. त्यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभे राहत आहे. तरुण पिढीला संत साहित्याची आवड निर्माण व्हावी, आपली संस्कृती कळावी यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने चिखली येथे संतपिठ उभारण्यात आले. अवघ्या पिंपरी चिंचवडकरांना अभिमान वाटावा असा हा प्रकल्प आहे असे भालेकर म्हणाले.
आमदार लांडगे यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. इतरांनी सांगितलेल्या चांगल्या योजना राबविण्याची त्यांची मानसिकता आहे. शहर विकासाचे व्हिजन असलेली अनेक हुशार माणसे त्यांच्याकडे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार लांडगे यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना कोणताही गर्व नाही. लहान मुले, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक कोणीही असो त्यांचे ते मन पटकन जिंकून घेतात. लोकांच्या सुखदुःखात मिसळणारा, प्रचंड कष्ट घेणारा आणि कामात सातत्य असलेला नेता अशी लांडगे यांची ओळख आहे. कर्म चांगले असेल ,कष्ट करण्याची आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर निश्चितपणे यश हे ठरलेले आहे. त्यामुळेच आमदार महेशदादा लांडगे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास भालेकर यांनी व्यक्त केला.