महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीय

महेश लांडगे यांचा प्रचाराचा ‘सुपर संडे’

‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’मध्ये झंझावाती प्रचारगाठीभेटी, सोसायटीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ११ नोव्हेंबर २०२४) महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात अंमलबजाणी सुरू झालेला सोसायटीधारकांवरील कचरा उपयोगकर्ता शुल्क वसुलीला आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच स्थगिती मिळाली. सोसायटीधारकांचे १६५ कोटी रुपयांचे ओझे कमी झाले. बिल्डरसोबत संवाद साधून आमच्या समस्या सोडविल्या. सोसायटीधारकाच्या कोणत्याही समस्येसाठी आमदार लांडगे धावून येतात. त्यामुळे आमचा पाठींबा आमदार महेश दादा लांडगे यांनाच असल्याची ग्वाही चिखली, मोशी परिसरातील सोसायटीधारकांनी दिली.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी चिखली, मोशी परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमच्या समस्यांसाठी मदतीला धावून येणाऱ्या महेश लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची हमी यावेळी महिला भगिनींसह युवक, युवतींनी दिली. विशेष म्हणजे, रविवारी एकाच दिवसात आमदार लांडगे यांनी तब्बल १८ ठिकाणी आपुलकीच्या बैठकांना उपस्थिती दर्शवली. तसेच, सायंकाळी विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये सेक्टर- १२ येथे सभा घेण्यात आली. त्यामुळे प्रचाराचा ‘सुपर संडे’ झाला.

आमदार लांडगे यांनी शाईन सिटी, ब्ल्यू डाइस, केसर व्हेली, ऐश्र्वम म्हाडा,सिल्वर नाइन, डेस्टिनेशन मेमोर सोसायटी, मिस्ट्री ग्रीन, स्वराज फेज ३, मंत्रा गारमेट्स सोसायटी, गंधर्व एक्सलन्स क्लब, वूड्स व्हिलेज फेज २, इंद्रधनू सोसायटी, कस्तुरी ओयाज या परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटीं घेतल्या. यावेळी सर्व ग्रामस्थ, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकासाचे रोल मॉडेल आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय आणले. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे कचरा डेपोतून येणारा दुर्गंधीयुक्त वास बंद झाला. या भागातील विकास आराखड्यातील रस्ते विकसित केले. त्यामुळे आमच्या फ्लॅटच्या किंमती वाढल्या. आमच्या प्रश्नांसाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनासोबत संवाद मेळावा घेतला जातो. आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार महेश लांडगे चोवीस तास उपलब्ध असतात. त्यामुळे आम्ही सोसायटीधारक त्यांच्यासोबत असल्याचा शब्द नागरिकांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button