राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे बुधवारी प्रकाशन
पिंपरी, पुणे (दि. ५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदार संघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ जाहीरनाम्याचे प्रकाशन दापोडी, फिरंगाई मंदिर येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा ऑनलाइन पद्धतीने प्रकाशित होणार आहे.
त्यानंतर दुपारी ११:३० वाजता पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतिचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात येणार आहे.
प्रचार फेरी सिद्धार्थ नगर, नरवीर तानाजी पुतळा, पवार वस्ती, एसएमएस कॉलनी, आतार वीटभट्टी, महाविहार, काचीवाडा, फुलेनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खालची आळी विठ्ठल मंदिर, समर्थ व्यायाम शाळा, शिवम मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, वरची आळी विठ्ठल मंदिर, ११ नंबर बस स्टॉप, मंत्री कॉम्प्लेक्स, सुंदर बाग, गणेश गार्डन या मार्गाने प्रचार फेरी जाणार आहे. तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे आवाहन करण्यात आले आहे.