महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

कामगारांना न्याय देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले – रवींद्र चव्हाण

कामगारांच्या विश्वासास पात्र राहणार - अनुप मोरे; चिंचवड मध्ये माथाडी पदाधिकारी राज्यस्तरीय मेळावा संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २९ सप्टेंबर २०२६) जुन्या कामगार कायद्यामुळे भांडवलशाही मंडळी कामगारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करून कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे. नवीन कामगार कायद्यातून कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, आभा कार्डद्वारे पूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा लाभ यासह अनेक सुविधा मिळणे आता सुलभ झाले आहे. या कायद्याच्या चौकटीत कामगारांना संरक्षण मिळत आहे. अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी संघटनेच्या राष्ट्रमातेचा समावेश असणारा लोगो हा राष्ट्र प्रथम हे कर्तव्य दर्शवणारा आहे. या संघटनेचे ५० हजार सदस्य नोंदणीचे ध्येय पूर्ण होण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभी राहील असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चिंचवड येथे केले.

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मंगळवारी (दि. २९) चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश दादा लांडगे, शंकर जगताप, उमाताई खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक तुषार हिंगे, अध्यक्ष विजय हरगुडे, जयदीप खापरे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, अक्षय वरघडे, राकेश सणस, वसीम शेख आदींसह हजारो माथाडी कामगार उपस्थित होते. यावेळी नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अनुप मोरे सारखा युवा कार्यकर्ता राज्यात माथाडी कामगारांचे नेतृत्व सक्षमपणे करीत आहे. अल्पावधीत या कामगार संस्थेचे १५ हजार सदस्य नोंदणी केली आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगारांनी कामगारांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी निर्णय घेत आहेत. देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांच्या माध्यमातून २५ कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढण्याचे काम केले आहे.

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांनी स्वागत करताना सांगितले की, ही संघटना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार २०१४ मध्ये स्थापन केली आहे. या माथाडी युनियन चे महाराष्ट्रात १५ हजार सदस्य सभासद झाले आहेत. आहेत. २०२९ मध्ये राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आणण्यासाठी माथाडी युनियनचे ५० हजार सभासद नोंदणीचे ध्येय ठेवून काम करीत आहे असे वचन अनुप मोरे यांनी कामगारांच्या साक्षीने महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले तसेच राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता येण्यासाठी कामगारांनी तुम्ही आमच्या पाठीशी राहावे असे कामगारांना आवाहन केले. कामगारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू कसा शब्द दिला. नेत्यांनी मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली याचे सोने करून कामगारांच्या न्यायासाठी लढत राहू असेही अनुप मोरे म्हणाले.

प्रास्ताविक ॲड. विजय हरगुडे, सूत्रसंचालन अक्षय मोरे आभार संतोष कांबळे यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button