एसबीपीसीओएडी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न


पिंपरी, पुणे (दि. २९ सप्टेंबर २०२६) आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. तरीही भारतात वास्तुविशारद क्षेत्रात अनेक संधी देखील उपलब्ध आहेत. जिथे कमतरता असते तिथे संधी उपलब्ध होते याचा उपयोग करून घेऊन आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद व आंतरराष्ट्रीय लँडस्केप डिझाईनर डॉ. महेश नामपुरकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (एसबीपीसीओएडी) मध्ये २०२५ – २६ मधील बॅचलर ऑफ आर्किटेक्टच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट पुणे सेंटर चेअरमन आर्किटेक्ट शितेश अग्रवाल, एसबीपीसीओएडी प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

नामपूरकर यांनी सांगितले की, वास्तुशास्त्र हा एक अतिशय सुंदर व्यवसाय आहे. विद्यार्थ्यांनी शिकण्याची आणि जे हवे आहे ते साध्य करण्याची जिद्द बाळगायला हवी. हे क्षेत्र तुम्हाला स्वातंत्र्य आणि सामर्थ्य देते. तसेच, तुम्हाला कुठे स्थायिक व्हायचे आहे, याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळतो. देशसेवा करण्याचे हे एक चांगले क्षेत्र आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माजी विद्यार्थिनी आर्किटेक्ट हरश्री नखरानी यांना २०२५ या वर्षातील सर्वोत्तम विद्यार्थी प्रेरणा चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच एमपीएससी स्पर्धा परीक्षेत असिस्टंट टाऊन प्लॅनर म्हणून निवड झाल्याबद्दल काजल थिटे, फोएड यंग वुमन अचीवर ऑफ द इयर हॉस्पिटलिटी साठी अंकिता पाटील, स्ट्राइड मेक स्पेस डिझाईन कॉम्पिटिशन मध्ये तिशा केला आणि आदर्श प्रधान तसेच पर्यावरण, शाश्वतता, वादविवाद पोस्टर डिझाईन बर्ड हाऊस डिझाईन आणि फोटोग्राफी मध्ये ओमकुमार बागले, जानवी भोसले, दिशा प्रधान, सिद्धी सावंत, भार्गवी पोहणे, आदित्य काळे, कृतिका चनी, प्रतिभा काकडे, सानिका काळे या बक्षीस विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कॅम्प फोटोग्राफी मध्ये प्रथम क्रमांक राधिका मंत्री, द्वितीय क्रमांक सानिका सुतार, तृतीय क्रमांक संदली मेंधळकर, विशेष सहभागासाठी मृदुल मारळ, मृण्मयी चौधरी, ऐश्वर्या जाधव यांचाही गौरव करण्यात आला. स्कार्स ऑफ इंडिया – द अनटोल्ड बॅटल्स या पुस्तकासाठी स्वरा मुसळे, कलर्स ऑफ धर्म या कलरिंग बुक साठी गार्गी साठे यांना बक्षीस देण्यात आले.


शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मधील ४३ गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.


तसेच २०२६-२७ च्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोद भेगडे, उपाध्यक्ष मृण्मयी चौधरी, सचिव कुशा गोयल, सांस्कृतिक प्रमुख सायली केसकर, क्रीडा प्रमुख मृदुल मारळ व विविध क्लब मध्ये निवड झालेल्या पदाधिकारी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अजय हरताळे, इंटरनल सीनियर सुपरवायझर ऋजुता पाठक, लक्ष्मण तोरगळे, किसन काळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

सूत्रसंचालन प्रा. शिवा शिशोविया व प्रा. दक्षा देशमुख यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी मानले.
——————————————————————




