भारत विकसित होण्यासाठी शेती उद्योगात अधिक संशोधनाची गरज – पद्मश्री प्रतापराव पवार
'एचआर एक्सलन्स अवॉर्ड' हा उपक्रम गौरव सोहळा - पद्मश्री प्रतापराव पवार


पिंपरी, पुणे (दि. ११ जून २०२६) देशाला विकसित राष्ट्र म्हणून पुढे जाण्यासाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, उद्योगात अधिक संशोधनाची गरज आहे. कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी भारतात एचआर व्यवसायिकांना खूप संधी आहेत. यासाठी पीसीयू सारख्या संस्थांनी स्थापन केलेल्या या व्यासपीठाचा एचआर अधिकाऱ्यांनी उपयोग करून घ्यावा. कोणत्याही संस्थेची शाश्वत प्रगती ही सकारात्मक सहभागातून साध्य होते. या संस्थेने बदलत्या व्यावसायिक वातावरणात सातत्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आहे असे प्रतिपादन उद्योगपती व पद्मश्री प्रतापराव पवार यांनी केले.

पुणे, बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे बिझनेस स्कूल, एचआर सक्सेस टॉक, आयस्किल बॉक्स आणि कोबज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अदानी पावर लि. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी अमिताभ मिश्रा, भारत फोर्स कंपनीच्या एच. आर. उपाध्यक्ष डॉ. लीना देशपांडे, पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उद्योजक नरेंद्र लांडगे, ज्येष्ठ संगणक तज्ञ उद्योजक दीपक शिकापूरकर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, एमइडीसी चे उपाध्यक्ष सचिन इटकर, पीसीईटी प्लेसमेंट डीन डॉ. शीतलकुमार रवंदळे, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, पीबीएस डीन डॉ. मीनाक्षी त्यागी, इंडस्ट्री इंटरॅक्शन सेल संचालक डॉ. प्रणव चरखा आणि परीक्षक, विविध गटातील पुरस्कार प्राप्त एचआर विविध कंपन्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रतापराव पवार यांनी सांगितले की, एचआर मधील नेतृत्वगुण त्यांच्या अनुभवा मधून विकसित होतात. जबाबदारी, शिस्त आणि उत्कृष्टता याद्वारे त्यांनी संस्थांमध्ये सकारात्मक बदल घडविण्याची भूमिका घ्यावी. पीसीईटी, पीसीयु आणि पुणे बिझनेस स्कूलचा ‘एचआर एक्सलन्स अवॉर्ड’ हा उपक्रम नेतृत्व, नवोपक्रम, सहकार्य आणि मानव संसाधन विकासाचा गौरव करणारा सोहळा आहे असे पद्मश्री प्रतापराव पवार यांनी सांगितले.
अमिताभ मिश्रा म्हणाले की, भारतासाठी एआय ही एक अमूल्य संधी आहे. एआय हे निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि वेगवान करू शकते, परंतु मानवी संवेदनांची,विवेकाची जागा घेऊ शकत नाही.
पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, मानव संसाधन पद्धती आणि नेतृत्वाला सन्मान करणे, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींना नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पीसीईटीच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येतात असे डॉ. गिरीश देसाई म्हणाले.
पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पीबीएस डीन डॉ. मीनाक्षी त्यागी आणि आभार इंडस्ट्री इंटरॅक्शन सेल संचालक डॉ. प्रणव चरखा यांनी मानले.
——————————————————————

