महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

करिअरमधील ब्लाइंड स्पॉट ओळखा – सुवोदीप मुखर्जी

"पीसीयू - सीएक्सओ २०२६ परिषदे"चे यशस्वी आयोजन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २८ फेब्रुवारी २०२६) आपल्या करिअरमधील आणि विकासातील ब्लाइंड स्पॉट ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सतत अपस्किलिंग आणि रीस्किलिंग याची गरज आहे. एआयचा वापर करून आपण त्यावर निश्चित मात करू शकतो असे प्रतिपादन सीआयआय कंपनीचे सीएसआर आणि विशेष प्रकल्प प्रमुख सुवोदीप मुखर्जी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन (ट्रिपल आय) सेल च्या वतीने पहिल्या “पीसीयू – सीएक्सओ २०२६ परिषद” चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सुवोदीप मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, सक्षम भारत कंपनीचे सीईओ बळीराम मुतगेकर, क्रॉस कंट्री हेल्थकेअरचे एचआर अतुल शेनॉय, पर्सिस्टंट कंपनीचे राजेंद्र लिंगवाल, एसीए ग्रुपचे राष्ट्रीय प्रमुख परस पारीख, कायनेटिक ग्रीन कंपनीचे रंजीत कोंडेशन, हस्क पॉवर कंपनीच्या प्रीती अहुजा, ॲक्सेंचर कंपनीचे संतानु दास, टीके एलेवेटर विष्णु पराशर, विप्रो कंपनीच्या अंकिता गुप्ता, एमएनएस ग्लोबल कंपनीच्या श्रुती भालेराव, बार्कलेज कंपनीचे माजी उपाध्यक्ष नितीन जोशी, टिके एलेवेटरचे संचालक अभय श्रीवास्तव, ॲक्सेंचर टेक्नॉलॉजीचे माजी महाव्यवस्थापक श्रीकांत सारडा, डसॉल्ट सिस्टीमचे गौरव गोसावी, ट्रिपल आयचे प्रमुख डॉ. प्रणव चरखा आदी उपस्थित होते.

या परिषदेत उद्योगाभिमुख उत्कृष्टतेकडे एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यासाठी एआय वापर करण्यात उद्योजक प्रतिनिधी यांनी आपले मत मांडले. परिषदेनंतर झालेल्या प्रश्न उत्तर सत्रामध्ये मध्ये विद्यार्थ्यांनी हॅकेथॉन, फ्रीलान्स प्रकल्प, नेटवर्किंग, सतत कौशल्य विकास याविषयी प्रश्न विचारले.

पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पीसीईटी विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन मंडळ आपल्या विद्यापीठाची देशात, परदेशात स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहे. नवीन उपक्रम आणि उद्योग संस्थांच्या सहभागाने विद्यार्थ्यांमध्ये मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा योग्य समन्वय साधून त्यांच्यात जागतिक दृष्टिकोन विकसित केला जाईल. पीसीयू परिसर लगत असलेल्या औद्योगिक पट्ट्यात उद्योजकांच्या अपेक्षा आणि गरजा नुसार पीसीयू अभ्यासक्रमात सातत्याने बदल करत आहे. यात अपस्किलिंग आणि रिस्किलिंग फ्रेमवर्क चा वापर केला जात आहे.

बळीराम मुतगेकर यांनी सांगितले की, एआय मुळे आमुलाग्र बदल होऊन अनेक नवीन संधी निर्माण होतील. त्यासाठी अनुकूल प्रगतिशील धोरणे तसेच सक्षम मनुष्यबळ तयार केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी एआयचा वापर प्रभावीपणे परंतु जबाबदारीने करून आपले करिअर घडवावे आणि देश विकासात आपण योगदान द्यावे.

ट्रिपल आय चे संचालक डॉ. प्रणव चरखा यांनी स्वागत करताना सांगितले की, “पीसीयू – सीएक्सओ २०२६ परिषद” मध्ये ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगात टॅलेंट रेडीनेस या विषयावर चर्चा झाली. यामध्ये उद्योजक, एचआर प्रतिनिधी, कार्पोरेट प्रतिनिधी, विविध कंपन्यांचे प्रमुख यांनी आपले मत व्यक्त केले. ही परिषद समन्वयक म्हणून काम करेल.

सूत्र संचालन आणि आभार अक्षता राजगुरू यांनी मानले.

पीसीईटीच्या अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button