महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीसामाजिक

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड

प्रांतपाल संतोष मराठे यांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १२ जुलै २०२५) तळेगाव दाभाडे येथील उद्योजक श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रोटरी क्लब ३३ वा पदग्रहण सोहळा नुकताच तळेगाव येथे संपन्न झाला.

सन २०२५-२६ वर्षासाठी अध्यक्ष रो श्रीशैल मेंथे, उपाध्यक्ष रो प्रमोद दाभाडे, सचिव म्हणून प्रसाद मुंगी व इतर १७ कार्यकारी सदस्यांनी प्रांतपाल संतोष मराठी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी सहायक प्रांतपाल विन्सेंट सालेर हे उपस्थित होते.

संतोष मराठे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आपल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे एक नावलौकीक असलेला क्लब आहे. आता अध्यक्ष श्रीशैल मेंथे आणि टीम येणाऱ्या वर्षात उल्लेखनीय काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

श्रीशैल मेंथे यांनी सांगितले की, सामुदायिक विवाह सोहळा या सामाजिक उपक्रमाचा आदर्श घेत विविध संस्थांनी असा उपक्रम सुरू केला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. शव दाहिनी प्रकल्प, आरोग्य व पर्यावरण पूरक प्रकल्प, गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत, आरोग्य शिबिर, गाव दत्तक योजना, गर्भशय कर्करोग तपासणी असे विविध उपक्रम सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्णत्वास नेऊ असा विश्वास व्यक्त केला. माजी अध्यक्ष कमलेश कार्ले यांनीही नवीन कमिटीला शुभेच्छा दिल्या.

तसेच डिस्ट्रीक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो विवेक दिक्षीत यांच्या उपस्थितीत क्लब मध्ये ४ नविन सदस्यांना रोटरी पिन देऊन क्लब सदस्यत्व दिले गेले. कल्याणी मुंगी व टीम निर्मित बुलेटिन चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी क्लबच्या ३२ वर्षांच्या कालखंडातील सक्रिय माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

प्रसाद मुंगी यांनी सचिव पदाची घोषणा केली. सूत्रसंचालन नीलिमा बारटक्के व राजेंद्र पोळ यांनी केले. आभार उपाध्यक्ष प्रमोद दाभाडे यांनी मानले. पदग्रहण समारंभ चेअरमन उध्दव चितळे, फेलोशिप चेअरमन गिरीश जोशी आणि ॲन्स मीट चेअरमन अर्चना चितळे यांनी कार्यक्रम संयोजनात सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button