महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीय

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी आरपीआय शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २५ एप्रिल २०२५) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी (दि. २७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जैतवन बुद्ध विहार शेजारी, वेणु नगर, वाकड, पुणे ५७ येथे अध्ययावत पक्ष कार्यालय उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक व आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब राजाभाऊ सरोदे, आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता ताई सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, संघटक सचिव सूर्यकांत वाघमारे, एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चांदमारे, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश दादा लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, आरपीआय युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, शहर सरचिटणीस दयानंद वाघमारे,

वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, अल्पसंख्यांक सरचिटणीस खाजाभई शेख, महिला आघाडी सचिव ईलाताई ठोसर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सिकंदर सूर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर, अंकुश कानडी, रमेश चिमूरकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम महाराष्ट्र प्रदेश श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष सतीश केदारी माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, स्वप्निल कांबळे, कमलताई कांबळे, सरचिटणीस बाबा सरोदे, कार्याध्यक्ष राजू उबाळे, योगेश भोसले, ज्येष्ठ नेते गौतम गायकवाड, अल्पसंख्यांक आघाडीचे शादाब पठाण, कामगार आघाडी अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजित कांबळे आदींसह आरपीआयचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button