प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देणार – संदीप झोंबडे
प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपा उमेदवारांनी बालाजी नगर मध्ये केला घरोघरी प्रचार

पिंपरी, पुणे (दि. ८ जानेवारी २०२६) भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवारांनी बालाजी नगर आणि सेक्टर चार, सहा येथे मतदारांच्या घरोघरी प्रचार पत्रक वाटत संपर्क साधला.

प्रभाग क्रमांक ८ चे भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे (अ), नम्रता योगेश लोंढे (ब), निलम शिवराज लांडगे (क), विलास हनुमंतराव मडिगेरी (ड) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी विनोद घोडेस्वार, संदीपान झोंबाडे, अनिल सुंदर, संतोष निसर्गंध, कुंदन काळे, विजय चौधरी, सागर भोसले आदींसह महिला भगिनी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करीत शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेले आहे. मोशी येथील कचरा डेपो मध्ये घनकचऱ्याचा वापर करून विज निर्मिती करण्याचा प्रकल्प, भामा आसखेड धरणातून परिसराला पाणीपुरवठा, मोठ्या प्रमाणात सुरू असलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, विस्तृत आणि स्वच्छ रस्ते, कोविड काळात नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा, प्रभाग क्रमांक आठ मध्ये उद्यान, क्रीडा संकुल विकसित केले आहेत.

संपूर्ण शहराला उपयोगी ठरणारे वाहतूक पर्यावरण विभागाचे कार्यालय सेक्टर सहा मध्ये सुरू केले आहे अशा अनेक विकास प्रकल्पामुळे प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे (अ), नम्रता योगेश लोंढे (ब), निलम शिवराज लांडगे (क), विलास हनुमंतराव मडिगेरी (ड) यांनाच प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला असल्याचे जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे व संतोष निसर्गंध यांनी सांगितले.
—————————————————————–



