कोकण नवविकास मंडळाच्या वतीने थेरगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

पिंपरी, पुणे (दि. २१ जानेवारी २०२६) थेरगाव येथील कोकण नवविकास मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी (दि. २६ जानेवारी) थेरगाव, आनंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहन, सकाळी १० नंतर सत्यनारायण महापूजा, हळदी कुंकू, महा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय बडंबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
यावेळी ऑडिटर हिमगौरी कुमावत, मानवी अधिकार आणि गुन्हेगारी संरक्षण संस्था राष्ट्रीय अध्यक्षा सुशिला पवार, पांचाळ – सुतार समाज कोकण विभाग अध्यक्षा दिपाली पांचाळ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
कार्याध्यक्ष गणपत बडंबे, खजिनदार ईश्वरदास घारे, सचिव अंकुश सुतार, उपाध्यक्ष नागेश सुतार, नितेश जाधव, उप खजिनदार मनोहर चव्हाण, तुषार बडंबे, सह सचिव दिलीप शिंदे, दिलीप कदम, सदस्य दत्तात्रय गोफण, रामचंद्र शिवगण, प्रमोद तेलंगे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.
——————————————————————



