महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

‘मी… माझा प्रवास’ या चर्चासत्राचे मंगळवारी पीसीसीओई मध्ये आयोजन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ९ ऑक्टोबर २०२६) ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ या चर्चासत्राचे मंगळवारी (दि. १३) पीसीसीओई मध्ये आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता, मेकॅनिकल सेमिनार हॉल येथे होणार आहे. या चर्चासत्रात सिटी प्राईड स्कूलच्या प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे, कायदा सल्लागार ॲड. परिक्रमा खोत, स्त्री रोग तज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार, न्यू एज फायर फायटिंग कंपनी संचालक सुजल शाह आदी सहभागी होणार आहेत.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, अधिष्ठाता डॉ. शीतल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांना कौटुंबिक, व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना, वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या विषयीचे त्यांचे अनुभव, तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना त्यांचा व्यवसायिक प्रवास, आव्हाने तसेच दैनंदिन जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळण्याचे व्यावहारिक उपाय आदी विषयांवर महिलांचे विचार मंथन व्हावे त्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे असे अंतर्गत तक्रार समिती उपाध्यक्ष सहा. प्रा. वृषाली भालेराव यांनी सांगितले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button