महाराष्ट्रकलाचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक – वासवी मुळे

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये इंटीरियर डिजाइन कोर्सचा स्वागत समारंभ

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ९ ऑक्टोबर २०२६) इंटेरियर डिजाइनर म्हणून काम करीत असताना पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे जाऊन सर्जनशील दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या क्षेत्रामध्ये नव्या पिढीतील होतकरू युवकांना आपल्या कल्पनाशक्ती सादर करण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत. अनेक डिझायनर महत्त्वपूर्ण योगदान देतात तेंव्हा उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते असे मार्गदर्शन प्रख्यात आर्किटेक्ट वासवी मुळे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, आकुर्डी, पुणे येथे प्रथम वर्ष डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाईनच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात वासवी मुळे बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी, लक्ष्मण तोरगले आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक अपेक्षा, विविध अध्ययनाच्या संधी तसेच इंटिरिअर डिझाईनच्या व्यापक क्षेत्राची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कुतूहल, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाने डिझाईन क्षेत्रामध्ये करिअर करावे.

या कार्यक्रमात आर्किटेक्ट वासवी मुळे यांनी आपले व्यावसायिक अनुभव सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button