ऐतिहासिक वास्तू सांस्कृतिक परंपरा आणि वास्तुकला संबंध समजून घेण्यासाठी मार्गदर्शक – डॉ. स्मिता सूर्यवंशी
‘दीक्षारंभ २०२६’ मध्ये वास्तुकलेच्या अभ्यासाची अनुभवाधारित ओळख


पिंपरी, पुणे (दि.७ ऑक्टोबर २०२६) वास्तु विशारद शाखेतील विद्यार्थ्यांना देहू, आळंदी येथील
ऐतिहासिक वास्तू या स्थानिक सांस्कृतिक परंपरा, परिसराचा संदर्भ आणि वास्तुकला यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी मार्गदर्शक आहेत. या वास्तू केवळ भौतिक रचना नसून तिच्यामागे इतिहास, संस्कृती, परंपरा, स्थानिक जीवनशैली आणि परिसराशी असलेले नाते दडलेले असते. वास्तुकला ही समाज, संस्कृती, पर्यावरण आणि मानवी जीवनाशी जोडलेली सर्जनशील प्रक्रिया आहे ती समजून घेऊन आर्किटेक च्या विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये प्रथम वर्ष बी.आर्क.च्या विद्यार्थ्यांचे ‘दीक्षारंभ २०२६’ कार्यक्रमात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

यावेळी आर्किटेक्चर प्रज्ञा आवटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वास्तुकलेचा अभ्यास केवळ वर्गातील सैद्धांतिक ज्ञानापुरता मर्यादित नसून प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभव, प्रयोग, सर्जनशील विचार आणि समूहकार्य यांद्वारे अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येतो. तसेच टाकाऊ वस्तू पासून मॉडेल मेकिंग तसेच फोटोग्राफीचा वापर कसा करावा याची माहितीही आवटे यांनी दिली.


या प्रथम वर्ष स्वागत समारंभातील विद्यार्थ्यांना
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
—————————————————————–




