अमेरिका, रशिया आणि केनिया येथील शिष्टमंडळाचा पीसीइटी ट्रस्ट मध्ये शैक्षणिक दौरा संपन्न


पिंपरी, पुणे (दि. ८ सप्टेंबर २०२६) विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण व संशोधन, रोजगार संधी व करिअरसाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी परदेशातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांशी संवाद वाढविला पाहिजे. या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या निगडी येथील कार्यालयात अमेरिका, रशिया आणि केनिया येथील शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली.

या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी स्वागत केले. यावेळी ट्रस्टच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.

या शिष्टमंडळात मनरो युनिव्हर्सिटी अमेरिकाचे आग्नेय आशिया ऑपरेशन्स सहाय्यक संचालक आशा अलोशियस, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका स्टुडंट सक्सेस ॲडव्हायझर रोचेस्टर विंचो चौहाई,
आंतरराष्ट्रीय संबंध विभाग कझान इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटी रशिया चे डेनिस कीको, युनिव्हर्सिटी रिलेशन्स ऑफिसर सेंट लुईस युनिव्हर्सिटी अमेरिका अभिनव भारद्वाज, प्रादेशिक प्रतिनिधी मिडवे युनिव्हर्सिटी अमेरिका रजत कुशवाह, शाळा समुपदेशक लाइट अकादमी केनिया चे पॉल, उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स स्टडी मेट्रो अभिनव बजाज, प्रादेशिक संचालक स्टडी मेट्रो राज कपूर, पंकज चव्हाण आदींचा समावेश होता.
पीसीइटीच्या सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी पीसीईटीच्या शैक्षणिक, संशोधन देवाणघेवाण, संशोधन सहकार्य, संस्थात्मक भागीदारी यातील संधी याविषयीची माहिती यावेळी सादर केली.
शिष्टमडळाच्या या भेटीत अमेरिका, रशिया आणि केनिया मधील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या संधी बाबत, करिअर निवडणे यांची माहिती दिली. या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर पीसीईटीला आगामी काळात शैक्षणिक आणि संशोधन विषयी सामंजस्य करार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
——————————————————–



