महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे – उद्योजक शंकर जाधव

पीसीयूमध्ये पुणे मॅनेजमेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ' संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ जुलै २०२६) विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पहावे आणि पाठ्य पुस्तकांशिवाय अवांतर ज्ञान मिळविणे, शिस्त, वृत्तपत्र वाचन, बाजारपेठेची समज आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उच्च शिक्षण घ्यावे. व्यवस्थापन शास्त्र शिक्षणामुळे योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे असे मार्गदर्शन टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर शंकर जाधव यांनी केले.

कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी पुणे मॅनेजमेंट स्कूलच्या चौथ्या बॅचचे स्वागत करताना पीसीईटीच्या समृद्ध शैक्षणिक वारशाचा उल्लेख केला. त्यांनी उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, चॉईस बेस्ड शिक्षणपद्धती, नियमित औद्योगिक भेटी, उद्योगतज्ज्ञांशी संवाद, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि ‘वन फॅकल्टी, वन इंडस्ट्री’ याची माहिती दिली व स्वतःच्या विकासासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या च्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या येथे पुणे मॅनेजमेंट स्कूलमध्ये ‘दीक्षारंभ २०२६–२७’ या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, एमइडीसी उपाध्यक्ष व पीसीयू गव्हर्निंग बोर्ड सदस्य सचिन इटकर, पीसीयू ग्रुप मॅनेजमेंट प्रोग्राम सल्लागार डॉ. गणेश राव, स्कूल ऑफ मॅनेजमेंट डीन डॉ. अमित पाटील, टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर शंकर जाधव, केपीआयटी एक्झिक्युटिव्ह बोर्ड सदस्य पंकज साठे, सीए प्रमोद जैन, प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

सचिन इटकर यांनी विद्यार्थ्यांनी विकसित भारत २०४७ च्या प्रवासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. सकारात्मक दृष्टिकोन, सातत्याने ज्ञान संपादन, वाचनाची सवय, स्पष्ट करिअर ध्येय आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही सांगितले.

पंकज साठे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटलायझेशन आणि नवोन्मेषामुळे व्यवसाय क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांची माहिती दिली.

सीए प्रमोद जैन यांनी सांगितले की, कालावधीत ज्ञान, नेटवर्किंग आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करून पालकांच्या गुंतवणुकीचे सर्वोत्तम मूल्य निर्माण करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक करताना डॉ. अमित पाटील यांनी ‘दीक्षारंभ’ म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे असे सांगितले. नवोन्मेष, उत्कृष्टता, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, भावनिक बुद्धिमत्ता आणि आत्मशोध यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

पीसीयू चे कुलपती तथा पीसीइटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आला होता.
————————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button