महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

मंगलाताई कदम यांची राष्ट्रवादी पक्षामधून हकालपट्टी करा – रवींद्र ओव्हाळ

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १९ मे २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी माजी महापौर मंगलाताई कदम यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. सोमवारी मंगलाताई कदम यांचा एक कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यामध्ये त्यांनी मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी काम केल्याची अप्रत्यक्षरीत्या कबुली दिली आहे. नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला भाजपाची उमेदवारी मिळवून देऊन जाहीरपणे प्रचार केला आहे. याची पक्षप्रमुख म्हणून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी गंभीर दखल घेऊन मंगलाताई कदम यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून त्यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रावर खजिनदार दीपक साकोरे, सेवादल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी आणि वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखेडे यांनी देखील सह्या केल्या आहेत, तसे पत्र रवींद्र ओव्हाळ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


———————————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button