उत्तम दंडीमे यांना मानद डॉक्टरेट प्रदान


पिंपरी, पुणे (दि. १९ मे २०२६) पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम गोविंदराव दंडीमे यांना वृंदावन धाम (मथुरा), उत्तर प्रदेश येथील पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाची “विद्यावाचस्पती” सारस्वत (मानद डॉक्टरेट) ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे.नवी दिल्ली येथिल हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवी प्रदान सोहळ्यात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. सुधीर कुमार आर्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. इंदु भूषण मिश्र “देवेंदु” यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी दिल्ली शिक्षाबोर्ड प्रमुख डॉ. रेखा चव्हाण या उपस्थित होत्या.

उत्तम दंडीमे यांचे साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील योगदान याची नोंद घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, मराठवाडा प्रतिष्ठान व आर्य समाज पिंपरी, पुणे या संस्थांचे सक्रिय सभासद व पदाधिकारी आहेत. खडकी येथील ५१२ आर्मी बेस वर्कशॉप येथून सेवा निवृत्त झाले आहेत. वयाच्या ७० व्या वर्षी दंडीमे यांना मिळालेला सन्मान तरुणांना प्रेरणादायी आहे.
—————————————————————————-



