महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

पिंपरी चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेचा १३ टक्के लाभांश जाहीर

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १९ मे २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महापौर रवी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. शनिवारी (१६ मे) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व क्रीडा सभापती कैलाश कुटे, पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी येळवंडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर शिंदे, खजिनदार अभिषेक फुगे यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.

यावेळी महाराष्ट्र विकास अधिकारी विलास लिंबळे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सर्व सभासदांना १३ टक्के लाभांश, सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांना रुपये ५०० सभा भत्ता देण्यास देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासदत्व असणाऱ्या सभासदांना शाल, स्मृतिचिन्ह, पाच हजार रुपये चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. सभासदांच्या गुणवंत पाल्यांना व राज्यस्तरीय खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

संचालक चारुशिला जोशी, सनी कदम, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, विजय नलावडे, अनिल लखन, कृष्णा पारगे, विजया कांबळे, संदीप कापसे, योगेश रानवडे, विजय मुंडे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, युनूस पगडीवाले, सल्लागार मनोज माछरे, दिगंबर चिंचवडे, महादेव बोत्रे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे, मदन चिंचवडे, प्रमोद अंबपकर, किसन आरजे, सुहास ताकवले, भाऊसाहेब शेलार, किशोर आठवाल, गौतम पायाळ, गौतम भालेराव, राकेश चव्हाण व सभासद उपस्थित होते.

प्रास्ताविकात चेअरमन शिवाजी येळवंडे यांनी संस्थे विषयी माहिती दिली. सचिव विश्वनाथ लांडगे यांनी वार्षिक सभा वृतांत सादर केला. याला सर्व सभासदांकडून बहुमताने मंजुरी देण्यात आली.

स्वागत व सूत्रसंचालन कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष महादेव बोत्रे आणि आभार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले.
————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button