महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

वैष्णवी शिंपी हिने पटकावला “कॅलिस्टा इंडिया २०२६” मानाचा मुकुट

“कॅलिस्टा इंडिया २०२६” आणि “कॅलिस्टा मिस, मिसेस महाराष्ट्र २०२६” स्पर्धेत सौंदर्यवतींचा जल्लोष

Spread the love

पुणे, पिंपरी (दि. ११ मे २०२६) आपल्या उपजत सौंदर्याबरोबरच परीक्षकांनी विचारलेल्या मार्मिक, तिरकस प्रश्नांना प्रचंड आत्मविश्वासाने उत्तर देऊन आपले व्यक्तिमत्व आणि बौद्धिकता सिद्ध करत जळगाव येथील वैष्णवी शिंपी हिने टाळ्यांच्या कडकडाटात आणि रंगीबेरंगी प्रकाश झोतात “कॅलिस्टा इंडिया २०२६” या बहुचर्चित सौंदर्य स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा आकर्षक मानाचा मुकुट आणि रोख २० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

कॅलिस्टा पेजंट्स आयोजित “कॅलिस्टा इंडिया २०२६” आणि “कॅलिस्टा मिस, मिसेस महाराष्ट्र २०२६” या सौंदर्यस्पर्धेत अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या सौंदर्यवतींना मुकुट, रोख बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉल येथे आयोजित केलेल्या या अंतिम फेरीस कॅलिस्टा पेजंट्सचे कार्यकारी संचालक संजीव जोग, आधार पशुपक्षी मित्र फाउंडेशन व हमारा विश्व फाउंडेशनच्या संचालिका अनिता अग्रवाल, मायफिल्म प्रॉडक्शनचे मयूर सोनवणे, करिश्मा सुर्ती, स्पर्धेचे परीक्षक दीपाली मुंधारे, ज्योती कामत, सोनल परब, डॉ. भवानी, रुबिना चव्हाण, रोशिता रोज, स्वरा खरोटे, इरा खान, सानिया खान, अनामिका राणी आणि अनिता गनवीर तसेच देशभरातून सहभागी झालेल्या आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या ३३ सौंदर्यवती उपस्थित होत्या.

प्रथम उपविजेतेपद पश्चिम बंगाल मधील काजल सोनकर हिला मुकुट, रोख १७ हजार रुपयांचे पारितोषिक, तर द्वितीय उपविजेतेपद विभागून जागृती गाणवे (रायगड) आणि वृषाली अजोटीकर (पुणे) यांना मुकुट आणि रोख १५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

ऑनलाईन कॅलिस्टा इंडिया २०२६ विजेत्या म्हणून डॉ. स्नेहल नारखेडे पोल, प्रियांका झाडे आणि अनिता महापुरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच ऑनलाईन कॅलिस्टा महाराष्ट्र २०२६ विजेत्या अंजना गावले आणि डॉ. सुषमा सोनवणे यांनाही गौरविण्यात आले. शुभांगी मंगरुळकर, पूजा बनोडकर आणि प्राची राय यांना उत्तेजनार्थ विशेष गौरवचिन्ह, मुकुट आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांच्या वतीने सोनेरी नथ, पैठणी साडी, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धकांच्या वेशभूषेसाठी विशाखा लोहार (श्रीवस्त्रम), पूनम होंकळसे आणि ओंकार पवार (ओपी फॅशन डिझायनर, कराड) तर सौंदर्य खुलविण्यासाठी प्रियांका चौधरी (श्रृंगार मेकओव्हर, तळेगाव दाभाडे) यांनी मेकअप पार्टनर म्हणून सहकार्य केले. अंतिम फेरीत ग्लॅमर आणि फॅशन विश्वाला समर्पित विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करिश्मा सुर्ती यांच्या हस्ते करण्यात आले.

सारिका आणि प्रतिभा डोलणारे, नितीन साळुंखे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.


——————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button