महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि पीसीईटी शिष्टमंडळाची बैठक संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १२ मे २०२६) जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी योग्य समन्वय साधून मजबूत जागतिक परिवर्तनकारी शैक्षणिक भागीदारी निर्माण केली पाहिजे. यासाठी ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सोबत एक दृढ नाते निर्माण करत आहे याचा पुढील काळात दोन्ही संस्थांच्या विस्तारासाठी उपयोग होईल असे मत यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विभाग, सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांनी व्यक्त केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या उपस्थितीत यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ सोबत २०२५ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या कराराचा पुढचा टप्पा म्हणून पीसीईटी आणि यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ शिष्टमंडळाची बैठक पीसीईटी ट्रस्टच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विभाग, सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट, प्रादेशिक व्यवस्थापक सामंथा वॅलिन, सल्लागार झफीर आलम आणि पीसीईटीच्या वतीने ओ. एस. डी. डॉ. योगेश भावसार, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. निरुपमा कोचेरलाकोटा, डिजिटल मार्केटिंग विभागाच्या शुभांगी रामटेके यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

पुढील काळात या दोन्ही संस्थांच्या मध्ये उच्च शिक्षण, संशोधन, शेती, सांस्कृतिक, कला, विद्यार्थी, प्राध्यापक विनिमय क्षेत्रात एक दृढ नाते निर्माण होईल. यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठ ही संस्था तिच्या शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उच्च शिक्षण संशोधन सुविधा साठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. या करारामुळे संयुक्तपणे शैक्षणिक संशोधन, परदेशात उच्च शिक्षण, संशोधन, दुहेरी पदवी प्राप्त करणे, अल्पकालीन अभ्यासक्रम, उन्हाळी शाळा उपक्रम, विद्यार्थी प्राध्यापक विनिमय, क्रेडिट हस्तांतरण आणि विद्यार्थी इंटर्नशिप असे सहयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या बैठकीनंतर दिली.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button