महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एस. बी. पाटील ज्यु कॉलेज वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ३ मे २०२६) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील ज्यु कॉलेज वाणिज्य शाखेचा १०० टक्के आणि विज्ञान शाखेचा ९८.८७ टक्के निकाल लागला आहे.

विज्ञान शाखेच्या अनुष्का पोळ ९३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम मिळवला. अनिशा काळे ९१.८३ टक्के गुण द्वितीय तर प्रांजल थोरात ८७.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली. तसेच वाणिज्य शाखेतील कार्तिक शेळके आणि मानसी सावंत यांनी ८८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. रोहिणी मुदलियार ८८.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर रितिका अमावासी ८७.६७ टक्के गुण मिळवून तृतीय आली.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य संदीप पाटील यांनी आभिनंदन केले.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button