महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

फिरोदिया करंडक मध्ये पीसीसीओईच्या “अख़्तरी” ला तृतीय क्रमांक

सानिया मुंगारे हिला "लीजेंडरी परफॉर्मर ऑफ द इयर" हा विशेष पुरस्कार, पीसीसीओइला वैयक्तिक १७ पारितोषिके

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२६) पुणे येथे झालेल्या ५२ व्या फिरोदिया करंडक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओइ) मधील आर्ट सर्कल संघाच्या “अख़्तरी” या नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच इतर वैयक्तिक १७ पारितोषिके मिळवली. तसेच तसेच सानिया मुंगारे हिला उत्कृष्ट लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि गायन बहुआयामी योगदानासाठी “लीजेंडरी परफॉर्मर ऑफ द इयर” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“अख़्तरी” या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अनुष्का भोईटे आणि सानिया मुंगारे यांनी केले. यातील प्रमुख पात्र असलेल्या बिब्बी चा ख्यातनाम गायिका बेगम अख्तर होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास मांडला आहे. यात तिने गायनावर समर्पण भावनेने प्रेम, तिची जिद्द आणि चिकाटी आणि भावनिक प्रवास अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे. आर्ट सर्कल संघाला सांस्कृतिक समन्वयक डॉ. मसनाजी नुकुलवार आणि डॉ. राजेश फुरसुले यांचे मार्गदर्शन केले.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे आणि विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख यांनी आर्ट सर्कल संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे लेखन तृतीय क्रमांक अनुष्का भोईटे आणि सानिया मुंगारे; दिग्दर्शन उत्तेजनार्थ अनुष्का भोईटे आणि सानिया मुंगारे; अभिनय प्रथम क्रमांक सानिया मुंगारे; नेपथ्य तृतीय क्रमांक शिवम खेतान आणि कृष्णा कळसपुरकर; वेशभूषा उत्तेजनार्थ रितिका सिंह; लघु कथा तृतीय क्रमांक आदित्य निळे आणि हर्ष गुमडेल; होलोग्राम प्रथम क्रमांक आदित्य निळे आणि सोहम ब्राम्हणकर; पिक्सल आर्ट प्रथम क्रमांक मानसी दीक्षित आणि आकांक्षा कुलकर्णी; शास्त्रीय नृत्य द्वितीय आर्या देशपांडे समृद्धी निंबाळकर, जुई येवले, समृद्धी शितोळे, आकांक्षा कुलकर्णी, माईशा दुफारे आणि वेदांती वाईकर; गायन प्रथम क्रमांक सानिया मुंगारे; गायन द्वितीय क्रमांक मधुरा दांडे; सुगम गायन द्वितीय क्रमांक अजिंक्य चौधरी; कथन प्रथम क्रमांक अनुष्का भोईटे; की-बोर्ड उत्तेजनार्थ राघवेंद्र करंडे; सर्वोत्कृष्ट तालवाद्य तृतीय क्रमांक शंतनू सोनार तसेच सर्वोत्कृष्ट तालवाद्य द्वितीय क्रमांक आयुष मडावी यांना पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


————————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button