पीसीसीओइ मध्ये “इनोव्हेट-एक्स २०२६” स्टार्टअप स्पर्धा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओइ) येथील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस फोरम (सीआयआयएल) आणि इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (आयइएन) सेल यांच्या वतीने “इनोव्हेट-एक्स २०२६” या तीन दिवसीय स्टार्टअप संकल्पना सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी पायोनिर केबल ट्रे कंपनीचे कौस्तुभ वाणी, न्यू इरा सोल्युशन कंपनीचे सिम्पल जैन, सिक्युर झोन कंपनीचे रितेश खेड़ा, पुणे एचआर इन्स्टिट्यूटचे नतांश दुबे, ए फोर डिझाइन अँड डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या आरती श्रीमाली, ऑटोसार कंपनीचे प्रशांत रोकडे, डीन आयइएन डॉ. रजनी पी. के. आणि सीईओ, सीआयआयएल अर्चना पाचणकर आदी उपस्थित होते.

प्रथम क्रमांक – टीम इन्फर्जी
या स्पर्धेत एकूण २२२ स्पर्धकांनी नोंदणी केली आणि १५३ विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड विद्यापीठ, एमआयटी – डब्ल्यूपीयू, एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे बिझनेस स्कूल, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, जेएसपीएम पॉलिटेक्निक कॉलेज, ताथवडे आदी महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

द्वितीय क्रमांक – टीम एक्सोफॉर्म
प्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या स्टार्टअपचे सादरीकरण केले. त्यातून २० उत्कृष्ट ‘स्टार्टअप लीडर्स’ निवडण्यात आले आणि या लीडर्सनी एक टीम तयार करून व्यवसाय मॉडेल, ग्राहक पडताळणी करून पुन्हा प्रकल्प सादर केले.

तृतीय क्रमांक – टीम ट्रॅक माय स्टार्टअप
या स्पर्धेत विजेते प्रथम क्रमांक – इन्फर्जी टीम (रुपये ४०,००० हजार), द्वितीय क्रमांक – एक्सोफॉर्म टीम (रुपये २५,००० हजार) आणि तृतीय क्रमांक – ट्रॅक माय स्टार्टअप टीम (रुपये१०,०००) यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच साईन सिंक टीम ला उत्कृष्ट सादरीकरण हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ग्रीन ग्रो, ग्रॅबिट, हिलिंग हर्ब्ज, कॉस्मेरा, ब्ल्यू ओशियन, बायोट्वीन या टीम ला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेत आरोमा एसीआर सिस्टम प्रा. ली. चे अरुण चिंचोरे, द कन्सिस्टेंट अकॅडमीच्या विद्या वानखेडे, इको चिल सिस्टीमचे सुनील गोगटे यांनी परीक्षण केले.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओइचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
———————————————————————-



