महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

पुण्यातील बहुजन नेते डॉ. हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) मध्ये प्रवेश

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.२४ मार्च २०२६) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या दुरदृष्टी नेतृत्वात बहुजनांसाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त करीत पुण्यातील बहुजन, दलित, वंचित, पीडित, उपेक्षितांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणारे बहुजन नेते व माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी यांनी आरपीआय (पाठवले) पक्षात प्रवेश केला आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ना. रामदास आठवले यांनी पुष्पगुच्छ देऊन चलवादी यांचे पक्षात स्वागत केले.

पक्षप्रवेश करतांना डॉ.चलवादी यांनी साहेबांच्या नेतृत्वात बहुजन चळवळीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी डॉ. चलवादी यांच्या सह बसपचे पुणे जिल्हा प्रभारी अनिल त्रिपाठी, चलवादी माळा विकास महासंघाचे अध्यक्ष भीम सिंह चलवादी, ॲड. प्रदीप चिंचोलीकर, निवृत्त आयपीएस अधिकारी अविनाश मस्के, निवृत्त प्रॉव्हिडंट फंड आयुक्त विकास जावळे, प्रकाश सोनवणे, सुधीर वाघमोडे, माजी नगरसेवक संतोष आरडे यांनीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश महासचिव गौतम सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, आरपीआय (आ) पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, इतर माजी नगर सेवक व पुणे व प्रदेश कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button