महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

नवोन्मेष व उद्योजकता विषयक परिसंवादाचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये आयोजन

पीसीयू मध्ये "सेंटर फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप" या केंद्राचे उद्घाटन होणार

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १७ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू), पुणे येथे शुक्रवारी, २० मार्च रोजी ‘नवोन्मेष आणि उद्योजकता’ या विषयावर एक दिवसीय भव्य परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था, स्टार्टअप संस्कृती, संशोधनाचे व्यापारीकरण, इन्क्युबेशन, बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर), पेटंट्स, डिझाईन आणि उत्पादन विकास यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर या परिसंवादात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, माजी कुलगुरू, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी), मुंबई हे असणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप’ या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि युवा उद्योजकांना स्टार्टअप इन्क्युबेशन, कल्पनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत मार्गदर्शन, तंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योग संलग्न संशोधन तसेच पेटंट आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या परिसंवादात पद्मश्री प्रतापराव पवार; डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; डॉ. एस. एस. मंथा, माजी अध्यक्ष अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीइ); डॉ. श्रीकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नवोन्मेष सोसायटी; डॉ. राजेंद्र जगदाळे, महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे; डॉ. अरविंद शालीग्राम, माजी कुलसचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी इनोव्हेशन सेंटर; तसेच सचिन इटकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल आदी उपस्थित राहणार आहेत.

या परिसंवादाविषयी अधिक माहिती देताना पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, या परिसंवादाचा उद्देश नवोन्मेष, उद्योजकता, संशोधनाचे व्यापारीकरण आणि उद्योग, शैक्षणिक सहकार्य यासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करणे हा असून विद्यार्थ्यांना आणि युवा उद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे शाश्वत स्टार्टअप्स व प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. यामध्ये पीसीयूचे विद्यार्थी स्टार्टअप्सचे अनुभव, नवीन विकसित केलेले प्रकल्प प्रदर्शित करतील. युवा नव उद्योजकांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार आणि धोरणनिर्माते यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

हा परिसंवाद पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शन व पाठबळातून आयोजित केला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मार्गदर्शनामुळे पीसीयूमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वांगीण विकास साध्य करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे.

या परिसंवादात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू, बीएचएयू सीओइपी, बीएचएयु इन्स्टिट्यूट सीईओ, रिसर्च पार्क फाउंडेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कर्मवीर भाऊराव पाटील क्लस्टर विद्यापीठ, सातारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) चे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली; श्री गुरु गोबिंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड; डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, पुणे; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे; आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग; डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन; नॅशनल केमिकल लॅबोरेटरी; सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी डॅक) या संस्थांमधील संचालक व वैज्ञानिकही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय फोर्ब्स मार्शल, गोदरेज इंडस्ट्रीज, डेलॉइट, विप्रो, पारी, मेरीटाइम रिसर्च सेंटर (एमआरसी) या प्रमुख उद्योगातील सुमारे ४० वरिष्ठ संशोधक, उद्योग प्रतिनिधी आणि व्यावसायिक सहभागी होणार आहेत.

प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी आणि संशोधन व विकास संचालक डॉ. भारत काळे, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे संचालक डॉ. शंकर देवसारकर हे संयोजन करत आहेत.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button