पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी पिंपरीत व्याख्यान

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १७ मार्च २०२६) वीर शहीद हुतात्मा भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी (दि. २० मार्च) सकाळी १० वाजता, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन पिंपरी येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पिंपरी आर्य समाज चे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर किरणजीत सिंग हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नयन कुमार आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी किरणजीत सिंग आर्यसमाज पिंपरी येथे होम हवन विधी मध्ये सहभाग घेणार आहेत अशी माहिती पिंपरी आर्य समाजचे मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी यांनी दिली आहे.

 

किरणजीत सिंग हे पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच येत आहेत. या व्याख्यानास आर्य समाज प्रतिनिधी व देश प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button