कॅरम स्पर्धेत पीसीपी मुलांचा सलग चौथ्यांदा विजय, मुलींचा सलग तिसऱ्यांदा विजय
पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक डी - १ झोनल कॅरम स्पर्धेत विजयी

पिंपरी, पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२६) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन व राजगड टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने डी – १ झोनल कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या (पीसीपी) मुलांच्या संघाने अंतिम फेरीत विजय मिळवला.

या स्पर्धेत पुणे विभागातून एकूण १० महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. साखळी सामने, उपांत्य फेरी व अंतिम सामना या तीन टप्प्यात स्पर्धा झाली.

पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक च्या संघात आदेश ठाकरे, प्रसाद मोरे, सम्यक गवळी, शिवाजी पवार, अद्वित साळुंखे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संघाने सलग चौथ्या वर्षी हा विजय मिळविला आहे. प्रा. राजू गायकवाड व सुनील गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या कॅरम स्पर्धेतील मुलींच्या संघाने देखील सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली. विजेत्या संघामध्ये प्रतीक्षा लांडगे, सायली सुर्वे, प्रगती गोरे, कस्तुरी मानमोडे, सानिका बेदाडे यांचा समावेश होता. यांना गायत्री फाटे आणि मयुरी देशमुख यांनी मार्गदर्शन केले होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीपी प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
——————————————————————



