विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पालकांनी देखील जागरूक रहावे – प्रा. रामदास बिरादार
पीसीयू मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी व पालक सभा संपन्न

पिंपरी, पुणे (दि.१८ फेब्रुवारी २०२६) विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग शंभर टक्के योगदान देईल. परंतु पालकांनी देखील जागरूक रहावे असे आवाहन पीसीयू चे प्रा. रामदास बिरादार यांनी केले. विद्यार्थ्यांचे वार्षिक गुणपत्रक, त्यांची प्रगती, प्रत्येक सत्रातील सरासरी गुण या विषयी पालकांनी पीसीयू मध्ये प्राध्यापकांशी संवाद साधला पाहिजे. पालकांनी पीसीयू वर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असेही प्रा. बिरादार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे अभियांत्रिकी प्रथम वर्ष विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पीसीयूचे प्रा. मनोहर कलगुंडे, प्रा. डॉ. उमेश कुटे, पालक प्रतिनिधी नीलम बेंडाळे, विद्यार्थी आणि पालक आदी उपस्थित होते.

या पालक सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शिवार्थ देव सिंह, चिन्मय पिंगळे, श्रेया बेंडाळे, शशांक अग्रवाल, अक्षिता कोठारी यांचा समावेश होता.

सूत्रसंचालन सायली मालकर, मोहीत पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सहभागी पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
———————————————————————–



