महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

आजची जागरूकता उद्याचा सशक्त समाज घडवते – डॉ. गिरीश देसाई

दीर्घायुष्य साठी आरोग्याचे मापदंड पाळणे आवश्यक - पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, पीसीयू मध्ये न्यूट्रीसोल कार्यक्रम संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.१७ फेब्रुवारी २०२६) न्यूट्रीसोल हा नाविन्यपूर्ण आणि बहुविद्याशाखीय उपक्रम आहे. यामध्ये पोषण, मानसशास्त्र, भावनिक कल्याण, सर्जनशीलता आणि अनुभवात्मक शिक्षण एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल. पारंपारिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग व संवादातून या व्यासपीठावरून विचारांची देवाणघेवाण करत शिक्षण मिळेल. न्यूट्रीसोल या उपक्रमाचा विस्तार आगामी काळात चळवळ म्हणून महाराष्ट्रभर केला पाहिजे. आजारात उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असते. आजची जागरूकता उद्याचा सशक्त समाज घडवते असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे “न्यूट्रीसोल २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ सायन्सच्या अधिष्ठाता प्रा. रुचू कूथीयाला, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च प्राचार्य डॉ. दीपा नायर आदी उपस्थित होते.

यावेळी “न्यूट्रीसोल २०२६ हेल्दी लाईफ स्टाईल कॅलेंडर” चे प्रकाशन आणि स्कूल ऑफ सायन्सेस, पीसीयू आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे सार्वजनिक आरोग्य, आंतरशाखीय शिक्षण आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांना चालना मिळणार आहे. तसेच मानसशास्त्र व पोषण शास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राशी प्रत्यक्ष संलग्न अनुभव संधी उपलब्ध होतील.

पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनाचे संतुलन आणि निरामय, निरोगी दीर्घायुष्य साठी आधुनिक धावपळीच्या काळामध्ये आहार आणि आरोग्याचे मापदंड पाळणे आवश्यक आहे. सर्वांगीण आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक संतुलन हे आपल्या जीवनशैली वर अवलंबून आहे असे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.

प्रास्ताविक मध्ये प्रा. रुचू कूथीयाला यांनी सांगितले की, न्यूट्रीसोल २०२६ मध्ये माहितीपूर्ण व संवादात्मक आरोग्य स्टॉल्स, मानसशास्त्र व पोषणावर आधारित उपक्रम, सहभाग वाढविणारे खेळ, थेरप्यूटिक स्ट्रीट अंतर्गत मार्गदर्शन उपचार व अनुभव, आहार तपासणी व पोषण जनजागृती, संतुलित व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामुळे न्यूट्रीसोल २०२६ हा उपक्रम मन, शरीर आणि समाजासाठी सर्वांगीण आरोग्य साजरा करणारा उत्सव ठरला.

अन्न साक्षरता, संतुलित आहार, प्रतिबंधात्मक आरोग्य, जागरूकता, मानसशास्त्र, भावनिक बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व शोध, आत्मचिंतन या विषयांवर विविध उपक्रम सादर करण्यात आले. या उपक्रमास ३५०० विद्यार्थ्यांनी भेट दिली. रील मेकिंग, पोस्टर मेकिंग, प्रश्नोत्तरे, नाटक सादरीकरण या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाला आयफिल इन्स्टिट्यूट, ब्राह्मणवाडी समुदाय तसेच अंगणवाडी आणि वृद्धाश्रमाचे प्रतिनिधी यांनी भेट दिली. पीसीयू – राहत क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला न्यूचेन्क, धांडे पॅथलॅब, इन बॉडी, पी अँड जी यांचे सहकार्य मिळाले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button