महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ उत्साहात संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १४ फेब्रुवारी २०२६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या वतीने ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’चे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून व्यवस्थापन शाखा शास्त्रातील विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक क्षमता वृद्धिंगत होतात तसेच विविध विषयांवर आत्मविश्वासाने गट सादरीकरण करण्यासाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध होते अशी माहिती एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट च्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी दिली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थी गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ चे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. धारवाडकर बोलत होत्या. यावेळी डॉ. स्वप्निल सोनकांबळे, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. भूषण परदेशी, डॉ. अमरीश पद्मा, डॉ. ऋषिकेश कुमार आदी उपस्थित होते.

या परिसंवादात “विकासाचा मध्यबिंदू काय असावा, माझे परिसर आणि माझे गाव – विकासाचे मॉडेल. महिला / युवती सुरक्षे मधील माझी भूमिका /जबाबदारी, ‘विकसित भारत’ माझे स्वप्न – माझा आराखडा, माझ्या करिअरची ब्ल्यू प्रिंट, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मी.” या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक (रु. ३०००/- रोख पारितोषिक) मानसी सातपुते, सार्थक कोल्हापूर, प्राजक्ता अगम, सायली काटे, सुमित पाचरे, लक्ष्मी सरडा;

द्वितीय क्रमांक (रु. २०००/- रोख पारितोषिक) पौर्णिमा दुगाणे, मानसी दवणे, प्रज्ञा तिवारी, कोमल गावडे, प्रणाली गाढवे, दिया बन्सल;

तृतीय क्रमांक (रु. १०००/
– रोख पारितोषिक) एकवीरा कांटाळे, भक्ती कोकणे, श्रेया भोसले, श्रावणी आवघड, तनश्री माधवी, कांचन चाहांदे यांनी बक्षीस मिळवले.

या परिसंवादासाठी परीक्षक म्हणून रोहित म्हसकर व श्रेयश पाटील यांनी काम पाहिले.

संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे व डॉ. काजल महेश्वरी आणि विद्यार्थी प्रतिनिधी दिया बन्सल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीइटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी विद्यार्थी सहभाग परिसंवादातील विजेत्यांचे अभिनंदन केले.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button