एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या स्वरदा यादव चा मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक


पिंपरी, पुणे (दि. ३ ऑक्टोबर २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी स्वरदा यादव हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात झालेल्या या १७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत रोप मल्लखांब व पोल मल्लखांब यामध्ये स्वरदा यादव हिने सर्वात जास्त गुण मिळवले यामुळे तिची पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक धनाजी पाटील हे तिचे मार्गदर्शक आहेत.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय अभ्यासक्रम बरोबरच विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी उत्कृष्ट सेवा सुविधा उपलब्ध करून दिला जातात.याचा स्वरदा यादव हिला उपयोग झाला आणि तिला हे यश प्राप्त करता आले असल्याचे प्राचार्य डॉ. बिंदु सैनी यांनी सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्वरदा यादव, क्रीडा शिक्षक धनाजी पाटील, मुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांचे अभिनंदन केले.
——————————————————————



