महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीयू मधील उच्च सुविधांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे – हर्षवर्धन पाटील

पीसीयू येथे इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १ ऑक्टोबर २०२६) भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या “इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स” या अत्याधुनिक सुविधा पिंपरी चिंचवड विद्यापीठ परिसरात उपलब्ध करून देणे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. येथे विद्यार्थ्यांना नवोन्मेषाचे प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी संधी मिळेल. या उच्च तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा आणि आपले कौशल्य सिद्ध करावे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या अंगभूत संशोधन आणि उद्योजक गुणांना संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ ठरेल असे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ कॅम्पस मध्ये “इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स” चे उद्घाटन पीसीयूचे कुलपती व पीसीइटी चे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयु व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आयटी आणि आयटीईएस प्रमुख डॉ.रामकृष्ण वडाली, पीसीयू फोर्ब्स मार्शल प्रमुख राजेश पाटील, सीइओ फाउंडर ऑफ डिजिटेक रोबोटिक इंडियाचे अजित गटे, लि आम, गजानन पाटील आदी उपस्थित होते.

पद्मश्री उद्योजक प्रतापराव पवार यांनी सांगितले की, एआय, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारखी क्षेत्रे भविष्यातील उद्योग विश्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक आणि रोजगार वाढीस चालना देणारे ठरेल. पीसीयू ने भविष्यातील गरजा ओळखून सुरू केलेला “इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स” हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या आणि उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

पीसीयू व टाटा मोटर्स डिप्लोमा प्रमुख डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, हा प्रकल्प पीसीयू टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी मधील डिप्लोमा प्रोग्राम तसेच केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित केलेला कौशल्य विकास कार्यक्रम यांना उपयुक्त ठरणार आहे.

प्रा. रामकृष्ण वडाली यांनी सांगितले की, सी डॅक पुणे, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. ली. आणि एएमडी यांच्या सहकार्याने या उच्च क्षमता असणाऱ्या १६ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांसह संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इंडस्ट्रियल मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन विथ आयआयओटी, इंडस्ट्रियल व्हर्च्युअल फॅक्टरी ऑटोमेशन अँड डिजिटल ट्विन, एआय रोबोटिक्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल डिझाइन, ॲडव्हान्स्ड एम्बेडेड आयओटी अँड एआयओटी, इंडस्ट्रियल कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, एआय अँड ॲडॅप्टिव्ह कॉम्प्युटिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब यांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती दिली.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button