महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराजकीयराष्ट्रीयसामाजिक

तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेत, शिंदे वस्ती येथे सुरू

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भव्य उद्घाटन; राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १७ सप्टेंबर २०२६) उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात वेळ घालविण्याऐवजी शुभम गोरे आणि प्रणिता गोरे या नवदांपत्याने काळाची गरज ओळखून वेगाने विकसित होत असलेल्या रावेत, शिंदे वस्ती, येथील राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी येथे तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ मोठ्या थाटामाटात सुरू केले आहे. ‘कॅफे अरोमा’चे भव्य उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

या उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळ्याला पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कॅफे अरोमा’ चे संचालक शुभम गोरे आणि प्रणिता गोरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, रावेत परिसरातील नागरिकांना ‘कॅफे अरोमा’ माध्यमातून स्वच्छ, सुरक्षित, प्रशस्त जागेत उत्तम आदरातिथ्य सेवा देण्याचा संकल्प आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंब व मित्र मंडळींसह खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी रावेत, शिंदे वस्ती (उड्डाणपुलाजवळ) येथील राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी ‘कॅफे अरोमा’ येथे अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक अपर्णा डोके, अनंत कोऱ्हाळे, शेखर चिंचवडे, आशाताई सूर्यवंशी, ऐश्वर्या तरस, रश्मी कातळे, पल्लवी वाल्हेकर, धम्मपाल तंतरपाळे, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र साळुंके आदींसह सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे, चिंचवड व्यापारी संघटनेचे प्रमुख राजू चिंचवडे, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत भोंडवे, महापालिका सेवानिवृत्त अधिकारी पी. बी. गायकवाड, उद्योगपती सुमित वाढोवकर, सुशील वाढोवकर, अमोल भोंडवे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, रेहान सय्यद, संतोष जराड, गणेश शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवी, पत्रकार देवा भालके, दिलीप देहाडे, जितेंद्र गवळी, शबनम सय्यद, अमोल डंबाळे, सोमनाथ काळे, भीमराव बरकडे, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक यांनी उपस्थित राहून ‘कॅफे अरोमा’च्या संचालकांना व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button